नाशिक – कांद्याला पाणी भरण्यासाठी गेलेल्या ४० वर्षांच्या शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा – उरणच्या पाणथळीवर भराव; पर्यावरणवाद्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
देवळा तालुक्यातील उमराणे येथील सुनील देवरे हे शेतातील कांद्याला पाणी भरण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परत आले नाही. सकाळी घरातील सदस्य शेतात गेले असता हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.