लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: शहरातील शिवाजीनगर-हुडको परिसरात वादातून गोळीबार केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी संशयिताला शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.

आणखी वाचा-जळगाव: वैज्ञानिक युगातही अंधश्रध्देचे जोखड, चाळीसगावात गुप्तधनासाठी पूजा; मांत्रिकासह नऊ जणांविरुध्द गुन्हा 

शिवाजीनगर-हुडको परिसरातील सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून वाद चिघळला. यामुळे तेथे परिसरातील रहिवाशांची गर्दी जमली. वाद घालणार्‍यांपैकी एकाने हवेत गोळीबार केला. यामुळे जमावाने तेथून तत्काळ काढता पाय घेतला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने धाव घेत हवेत गोळीबार करणार्‍या संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. तो एका गंभीर गुन्ह्यातील संशयित असून, जामिनावर सुटल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.