धुळे – राज्यभरातील वेगवेगळ्या भागांत अवकाळी पाऊस झाला आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात दोन दिवसांत महसूल विभागातर्फे पंचनामे पूर्ण होतील. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातच शेतकऱ्यांसाठी भरीव अशी मदत जाहीर होईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खोरी, टिटाणे आणि हट्टी भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीमुळे गहू, हरभरा, कांदा, पपई आणि केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री महाजन हे मंगळवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी साक्री तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. खा. सुभाष भामरे, आ. मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.

हेही वाचा – नाशिक : अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका; द्राक्षांची खुडणी थांबली, तडे जाण्याची भीती

हेही वाचा – धुळे : साक्री तालुक्यात गारपीटीमुळे २५० पेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि गहू आदींसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, म्हणूनच आपण तातडीने पाहणी दौऱ्यावर आलो, असे महाजन यांनी सांगितले. नुकसानग्रस्त भागाची आपण पाहणी केली आहे. सद्या अधिवेशन सुरू असल्याने नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येईल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे लागलीच प्रस्ताव पाठवण्यात येईल. ज्या ज्या वेळी अशी नैसर्गिक आपत्ती आली, त्या त्या काळात सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची भूमिका निभावली आहे. मध्यंतरीच्या काळात यात खंड पडलाही असेल, पण आता असे होणार नाही, असे त्यांनी सांगितले.