जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे वेळोवेळी संजय राऊत यांच्यावर टीका करीत आहेत. मात्र, मंत्रिपद मिळविण्यासाठी किती वेळा त्यांनी राऊत यांचे दार ठोठावले, हे गुलाबराव विसरले आहेत. गुलाबराव यांना मंत्रिपद संजय राऊत यांनीच दिले होते, असा दावा ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे दुर्वांकुर लॉन्सवर ठाकरे गटातर्फे जिल्हा परिषद गटातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. मेळाव्यात पक्ष संघटनसह शेतकऱ्यांचे प्रश्न व इतर विषयांवर विचारमंथन झाले. त्यानंतर सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले. गुलाबरावांनी आपली पात्रता तपासावी आणि मग संजय राऊत यांच्यावर आरोप करावेत. आपण ज्यांच्या जीवावर मोठे झालो आहोत, त्यांच्यावर आपण आरोप करू शकतो का, हे गुलाबराव यांनी तपासावे आणि मग निष्ठेच्या गोष्टी कराव्यात, असा टोलाही सावंत यांनी हाणला.

हेही वाचा >>> नाशिक : जामिनावरील ५५२ गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात हजेरी आवश्यक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून आपण गुलाबराव यांच्यासोबत काम केले आहे. त्यांचे अनेक किस्से व गोष्टी माहीत आहेत. जर गुलाबराव शांत झाले नाहीत, तर असे गौप्यस्फोट करीतच राहणार, असा इशाराही त्यांनी दिला. व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील आदी उपस्थित होते.