जळगाव : जिल्ह्यात मेहकर-भुसावळ बसवर दगडफेक झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील वरणगावनजीक सातमोरी पुलाजवळ घडली. यात बसमधील पाच वर्षाची बालिका जखमी झाली, तर बसच्या काचा फुटल्याने नुकसान झाले. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

मेहकर- भुसावळ बस दुपारी महामार्ग क्रमांक ६ वरील हॉटेल आमंत्रणसमोर आली असता विशाल बोंडे हा दुचाकीवरून बसपुढे आला. बसला दुचाकी आडवी लावून तो शिवीगाळ करू लागला. यावेळी त्याला समजावण्यासाठी प्रवाशांसह चालक व वाहक गेले असता त्याने दगडफेक सुरू केली. यात बसमधील देवांशी सुलताने ( रा. गुंजखेडा, लोणार, जि. बुलढाणा) हिच्या डोक्याला दगड लागला.

हेही वाचा : नाशिक : मराठा समाजाच्या विरोधाचा सुधीर मुनगंटीवारांना फटका, सावाना आमदार पुरस्कार वितरण सोहळा स्थगित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यात ती जखमी झाली. दगडफेकीत बसच्या दोन काचा फुटल्या. विशालने भुसावळ आगाराचे वाहक पिंगळे यांनाही मारहाण केली. याप्रकरणी चालक योगेश सावळे (३९, रा. खेडी बुद्रुक, ता. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.