जळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बेमुदत उपोषणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांना समर्थन देण्यासाठी चाळीसगावमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. ज्यांच्याकडून आरक्षणाला विरोध केला जात आहे, त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करून निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजातर्फे राज्यभर विविध आंदोलने केली जात आहेत. चाळीसगावमध्ये रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा : जळगाव : वरणगावजवळ बसवर दगडफेक; बालिका जखमी

हेही वाचा : नाशिक : मराठा समाजाच्या विरोधाचा सुधीर मुनगंटीवारांना फटका, सावाना आमदार पुरस्कार वितरण सोहळा स्थगित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाजी सेनेचे बापूसाहेब शिरसाठ, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, रयत सेनेचे गणेश पवार, मराठा सेवा संघाचे प्रशांत गायकवाड, निवृत्त सैनिक आबासाहेब गरुड, खुशाल मराठे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. मराठा समाज व जरांगे- पाटील यांच्यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आरक्षणाला विरोध करणारे नारायण राणे, ॲड. गुणरत्न सदावर्ते, रामदास कदम, सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. समाजबांधवांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला होता. यावेळी गणेश पवार म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या पाच रावणांच्या पुतळ्यांचे दहन केले. प्रमोद पाटील, लक्ष्मण शिरसाठ यांनी नारायण राणे, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.