नाशिक : भगूर गावातील वेताळबाबा रस्त्यावर नगरपालिकेकडून जलवाहिनी दुरूस्तीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून ४४ वर्षाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रविवारी सकाळी नगरपालिका कार्यालयात गर्दी करुन नागरिकांनी संताप व्यक्त केला. पालिका प्रशासनाने मृत व्यक्तीच्या पत्नीला नोकरी व मुलींसाठी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले.

शनिवारी रात्री वेताळबाबा रस्त्यावरील तुळसा लॉन्सजवळ जलवाहिनी गळत असल्याने सकाळी या ठिकाणी दुरूस्तीसाठी खड्डा करण्यात आला.काम झाल्यावर खड्डा बुजवला गेला नाही. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास दुचाकीने जाणाऱ्या अमित गाढवे यांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते दुचाकीसह खड्ड्यात पडले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. अमित हे कुटूंबातील एकमेव कमवते होते. गोळे कॉलनी येथील एका औषध दुकानात कामास होते.

हेही वाचा : Nashik Rain News: पावसाने झोडपल्याने नाशिक जिल्ह्यात नद्यांना पूर, बागलाणमध्ये घरांची पडझड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रविवारी सकाळी भगूर येथील नागरिकांनी नगरपालिका कार्यालयात गर्दी करत पालिकेस गाढवे यांच्या मृत्युसाठी दोषी धरले. नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात दाखल झाल्या. नागरिकांचा संताप पाहून मृत व्यक्तीच्या पत्नीला नगरपालिकेत नोकरी तसेच मुलींना आर्थिक मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.