नाशिक : सिन्नर तालुक्यातील वावी येथे दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयितांना पुढील तपासासाठी वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वावी येथील मयुरेश काळे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा दुपारच्या सुमारास काढून चोरांनी रोख रक्कम , दागिने लंपास केले. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला काही माहिती मिळाली. तांत्रिक तपास करुन सुनील म्हस्के (३१, साबरवाडी), चांगदेव देवडे (३५, बदापूर), कैलास मढवई (३४, चिंचोडी), अक्रम शेख (३१, विंचुर रोड), जीवन कोल्हे (२६, हडप सावरगाव), अलका जेजूरकर (४८, येवला) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरलेल्या रोख रकमेतील १४ लाख सात हजार रुपये, चोरीस गेलेले दागिने, चोरीच्या पैशांंतून खरेदी केलेला भ्रमणध्वनी, गुन्ह्यात वापरलेले वाहन असा २५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हेही वाचा : “भाजप जळगावमध्ये उमेदवार बदलणार”, संजय सावंत यांचा दावा

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik burglar gang arrested by police at vavi sinnar taluka css
First published on: 04-04-2024 at 23:45 IST