नाशिक – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मनसे ३१ प्रभागात घरोघरी जाऊन मतदार याद्यांवर काम करणार आहे. वाढत्या गुन्हेगारी विरोधात मनसे व शिवसेना ठाकरे गटाने मध्यंतरी संयुक्त मोर्चा काढला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कारवाई सुरू केली. गुन्हेगार आता ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणत आहेत. निवडणूक प्रचारात त्याचे श्रेय घेण्याची तयारी मनसेने केली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहा विभागात तीन दिवसीय प्रभागनिहाय दौरे पार पडले. प्रत्येक विभागात पदाधिकारी, मनसैनिकांच्या बैठका झाल्या. यावेळी पाटील यांनी मार्गदर्शन केले. मनसेकडून ३१ प्रभागात मतदार याद्यांवर काम करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभाग अध्यक्षांनी प्रत्येक प्रभागात त्वरित राजदूत व बीएलओ अर्थात मतदान केंंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या धर्तीवर कार्यकर्त्यांची नेमणूक करावी.
प्रभागातील प्रत्येक पदाधिकारी अंगीकृत संघटना, विद्यार्थी सेना, महिला सेना, शाखाध्यक्ष, राजदूत व बीएलओ यांनी प्रभागातील प्रत्येक घराघरात जाऊन मतदार यादीवर काम करायचे आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन घरोघरी पत्रक वाटप करायचे असल्याचे बैठकीत सूचित करण्यात आले.
महानगरपालिका निवडणूक मनसे ताकतीने लढणार असून सर्वांनी तयारीला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या. मनसेच्या सत्ता काळात नाशिकमध्ये झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत. आपण १२ सप्टेंबर रोजी काढलेल्या मोर्चामुळे महायुती सरकारची फजिती झाली. मोर्चामुळे सरकार जागे झाले आणि त्यांना संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारांविरोधात कारवाई करावी लागली. आपल्या मोर्चाची दखल म्हणून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ हे आपण सातत्याने केलेला पाठपुरावा आणि काढलेल्या मोर्चाचे श्रेय असून ते जनतेपर्यंत पोहचवावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी मागील नऊ वर्षात शहराची झालेली दुरावस्था, सामान्य नागरिकांसाठी मनसेने केलेली कामे, महायुती सरकारचे अन्यायकारक धोरण हे विषय प्रत्येक प्रभागात मांडायचे असल्याचे नमूद केले. बैठकीस शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे,जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, मनोज घोडके आदी पदाधिकारी व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.दिला असता संशयितांनी जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याआधी माजी नगरसेवक पवन पवारविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
