नाशिक : वीज उपकेंद्र आणि पंप हाऊसमधील विद्युतविषयक दुरुस्तीची कामे करण्यासाठी पंचवटीतील अनेक भागात शनिवारी सायंकाळी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. याबाबतची माहिती मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रातील उपकेंद्र आणि पंप हाऊसमध्ये विद्युतविषयक दुरुस्ती कामे तातडीने करणे आवश्यक आहे. तसेच महावितरण कंपनीला काही कामे करावयाची आहेत.

हेही वाचा : वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून चार जणांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे पंचवटीतील प्रभाग क्रमांक एकमधील संपूर्ण म्हसरुळ शिवार, प्रभाग क्रमांक चार आणि पाचमधील संपूर्ण मखमलाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, पंचवटी गावठाण परिसर तसेच प्रभाग क्रमांक सहामधील संपूर्ण मखमलाबाद शिवार, रामवाडी, हनुमानवाडी परिसर आणि प्रभाग क्रमांक तीनमधील हिरावाडी तसेच लगतचा परिसर आदी ठिकाणी शनिवारी सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच रविवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल, याची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.