नाशिक : स्वत:चे घरकुल असणे हे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. तसेच गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून देखील बांधकाम क्षेत्राकडे बघितले जाते. बांधकाम व्यवसायात सुसूत्रता आणण्याचे काम करणारी बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे सहा आणि सात एप्रिल रोजी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली.

हेही वाचा : नाशिक : शिक्षक-शिक्षकेतरांची फरक देयके त्वरीत द्यावीत, जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी

शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विद्यार्थ्यांसाठी घरे, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वेगळा प्रकल्प बनवण्यात आला असल्याचे पाटील यांनी सांगितले. शहरातील पाच विभिन्न ठिकाणी हे प्रदर्शन होणार आहे. शहरातील गंगापूर रोड येथील वृन्दावन लॉन्स, दिंडोरी रोडवरील पवार लॉन्स, पंचवटीतील स्वामी नारायण हॉल, गोविंदनगर येथील मनोहर गार्डन आणि नाशिक रोड येथील इच्छामणी लॉन्स येथे प्रदर्शन होणार आहे. प्रत्येक गृह, मालमत्ता महोत्सवाच्या ठिकाणी १०० हून अधिक कक्ष लावण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात अतिशय वाजवी दरामुळे छोट्या बांधकाम व्यावसायिकांनाही सहभागी होणे शक्य झाले आहे. ग्राहकांना एकाच छताखाली असंख्य पर्याय उपलब्ध होणार आहेत. याशिवाय अनेक आघाडीच्या गृहवित्त सहाय्य देणाऱ्या वित्तीय संस्थांचादेखील या प्रदर्शनात सहभाग राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : सातपुडा पायथ्याशी होळीआधी भोंगर्‍या बाजारात ढोलचा निनाद!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार असून १५ लाखांपासून काही कोटीपर्यंत रो हाऊस, सदनिका, दुकाने असे विविध पर्याय खुले करण्यात आले आहेत. ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधला जाणार असून वेगवेगळ्या प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.