नाशिक : जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची २०१८-१९ पासून अडकलेली फरक देयके त्वरित मिळावीत, प्रारंभी ६१६ आणि त्यानंतर ८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देयके ३१ मार्चपूर्वी मिळावीत, अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने वेतन पथक अधीक्षकांकडे केली आहे. देयके काढण्याच्या संदर्भात कोणतीही प्रतिक्षा यादी नाही. त्यामुळे २०२३ ची देयके निघाली असताना २०१८ ची देयके न निघणे हा अन्याय असून मोठ्या प्रमाणात दलालांकडून आर्थिक मागणी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या असल्याचेही नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथक अधीक्षक नितीन पाटील यांच्या लक्षात आणून दिले. संघाचे सचिव एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, मोहन चकोर, छोटु शिरसाठ, उमेश कांडेकर, डॉ. अनिल माळी, तुकाराम घुले, एम. डी. काळे यांनी मागण्यांचे निवेदन वेतन अधीक्षकांना दिले.

हेही वाचा : सातपुडा पायथ्याशी होळीआधी भोंगर्‍या बाजारात ढोलचा निनाद!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशी समितीत अडकलेली देयके शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्याकडून मंजूर झाली असून चौकशी समितीचे कारण देऊन देयकांची अडवणूक केली जाते. दोषी असणाऱ्या मोठ्या तीनही अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करावी, परंतु त्याची शिक्षा शिक्षकांना बसता कामा नये. तीन-चार वर्षापासूनच्या देयकांच्या रकमेचे व्याजही शिक्षकांना मिळावे, याबाबत शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, अधीक्षक नितीन पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली.