नाशिक शहरात वाहनांची तोडफोड करण्याची आणखी एक घटना बुधवारी घडली. शहरातील सातपूर परिसरात अज्ञात लोकांनी १५ ते २० दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये गाडयांची तोडफोड  करणे व जाळण्याच्या घटना वारंवार घडताना दिसून येते. पोलीसांकडून तोडफोड करणारया अज्ञातांचा शोध सुरू आहे.
सातपूर परिसरातील मायको ते शिवनेरी चौकापर्यंत रस्त्यावर उभ्या असलेल्या सुमारे १५ ते २० कार व दुचाक्यांची अज्ञात लोकांनी तोडफोड केली. गेल्या काही दिवसांपासून वाहनांची तोडफोड करण्याचे प्रमाण कमी झाले होते. बुधवारी पुन्हा झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात पुणे, पिंपरी चिंचवड, सिन्नर फाटा, पंचवटी काही शहरांमध्ये दुचाकी व कार तोडफोड करण्याचे प्रकार वारंवार घडतात. नुकतेच पिंपरीमध्ये काही स्थानिक गुंडांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी आठ ते दहा वाहनांची तोडफोड केली होती. सिडको आणि सातपूर परिसरात वाहन जाळपोळीसह तोडफोडीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. पोलीसांकडून कारवाई होऊनही वाहन तोडफोडीचे प्रकार कमी झालेले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik unknown person break vehicles
First published on: 17-08-2016 at 13:33 IST