नाशिक : ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या नाशिक विभागीय अंतिम फेरीत केटीएचएम महाविद्यालयाची (नाटय़शास्त्र विभाग) लाल डबा ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. ही एकांकिका ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत नाशिकचे प्रतिनिधित्व करणार आहे.  महाकवी कालिदास कलामंदिरात शुक्रवारी पार पडलेल्या विभागीय अंतिम फेरीत एसव्हीकेटी महाविद्यालयाच्या ..अन् गांधीजी म्हणत्यात एकांकिकेने द्वितीय, तर बीवायके महाविद्यालयाच्या व्हॉट्सअप बडी या एकांकिकेने तृतीय पारितोषिक मिळवले.

हेही वाचा >>> कांदा निर्यातबंदी विरोधात शरद पवार रस्त्यावर

नाशिक विभागीय अंतिम फेरीत केटीएचएम महाविद्यालयाची लाल डबा, एसव्हीकेटी महाविद्यालयाची ..अन गांधीजी म्हणत्यात, संदीप युनिव्हर्सिटीची भोक, बीवायके महाविद्यालयाची व्हॉट्सअप बडी, लोकनेते व्यंकटराव हिरे पंचवटी महाविद्यालयाची मैला या एकांकिकांचे सादरीकरण झाले. मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पाचही संघांनी कसून तयारी केली होती. त्यामुळे अपूर्व उत्साहात रंगकर्मीनी सादरीकरण केले. अंतिम फेरी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादाने, स्पर्धकांना प्रोत्साहन देणाऱ्या घोषणाबाजीने रंगली. 

प्रारंभी विभागीय अंतिम फेरीचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अभिनेता चिन्मय उदगीरकर, आंतरराष्ट्रीय महिला शरीरसौष्ठवपटू स्नेहा कोकणे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. पारितोषिक वितरण ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक कुमार सोहोनी, लेखक नीलकंठ कदम, लोकसत्ता वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक सुरेश बोडस, नाशिक संपादकीय विभागाचे अविनाश पाटील यांच्या हस्ते झाले.

नाशिक विभागीय अंतिम फेरी निकाल

* सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – के.टी.एच.एम. महाविद्यालय (लाल डबा)

* सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय -एस. व्ही. के. टी. महाविद्यालय (..अन् गांधीजी म्हणत्यात) 

* सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – बी. वाय. के. महाविद्यालय (व्हॉट्सअप बडी)

* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – प्रा. सूरज बोढाई, विक्रांत संसारे (लाल डबा)

* सर्वोत्कृष्ट लेखक- उत्तम लभडे (लाल डबा)

* सर्वोत्कृष्ट अभिनय- विक्रांत संसारे (लाल डबा)

* सर्वोत्कृष्ट  अभिनय – श्रद्धा पाटील (व्हॉट्सअप बडी)

* सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार – पंकज देशमुख, राज गव्हाणे (लाल डबा)

* सर्वोत्कृष्ट संगीत- रोहित सरोदे (..अन् गांधीजी म्हणत्यात)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- चैतन्य गायधनी (लाल डबा)