नाशिक – शहरातील गंगापूर रोड परिसरात बेंडकोळी नगरमध्ये सोमवारी मध्यरात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. सातपूर परिमंडळातील बेंडकोळी नगरात बिबट्याचा वावर असल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले होते. या परिसरात बिबट्याने पाळीव व भटक्या कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना फस्त केले होते.

या प्रकाराने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने जितेंद्र रुईकर यांच्या मोकळ्या भूखंडात वनपरिमंडळातील वनकर्मचारी यांच्याकडून पिंजरा लावण्यात आला होता. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाला याबाबत माहिती मिळाल्यावर त्याला सुरक्षितरित्या गंगापूर रोपवाटिकेमध्ये पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – एरंडोल तालुक्यातील मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द; सखोल चौकशीसाठी पाच सदस्यीय विशेष तपासणी समिती

हेही वाचा – जळगाव मनपा आयुक्तांविरोधातील अविश्‍वासावरील विशेष महासभा गणपूर्तीअभावी तहकूब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्या मृतावस्थेत

देवळाली परिसरात साडेतीन वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. वनविभागाने शवविच्छेदन करून गंगापूर रोपवाटिका येथे अंत्यसंस्कार केले.