नाशिक : मालेगावात परप्रांतीय व्यक्तीला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्याकडून दुचाकी आणि चोरलेले पाच हजार रुपये, असा ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मालेगाव येथील नवीन बस स्थानक परिसरात मोहम्मद अन्सारी (रा. सिसई) यांना हॉटेलमध्ये खोली पाहून देतो, असे सांगत चार संशयित सायने शिवारात घेऊन गेले. त्यांच्याकडील आठ ३८ हजार रुपये तसेच भ्रमणध्वनीच्या माध्यमातून काही पैसे ऑनलाईन वळते करून घेतले. भ्रमणध्वनी घेऊन पळून गेले.

हेही वाचा…साल्हेरजवळील सालोटा किल्ल्यावर चढाईसाठी नवीन वाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने चोरीचा समांतर तपास सुरू करुन मालेगावातील इस्लामियाँ कॉलनीतील सराईत गुन्हेगार अदनान खान (१९) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयिताकडून ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.