धुळे – तालुक्यातील धुळे-साक्री महामार्गावरील जवाहर सूतगिरणीजवळ तीनजणांनी छायाचित्रकाराच्या चेहऱ्यावर मिरचीपूड फेकून बंदुकीचा धाक दाखवित पाच हजारांची रोकड, भ्रमणध्वनी, १५ हजार रुपयांचे मंगळसूत्र असा सुमारे २८ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला.

हेही वाचा – मालेगाव गृहरक्षक समादेशक अय्युबखान पठाण यांना राष्ट्रपती पदक

हेही वाचा – नाशिकमध्ये लघु-मध्यम उद्योगांच्या समस्यांवर मंथन; उदय सामंत, दीपेंद्रसिंह कुशवाह यांची उपस्थिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेहऱ्यावर कापड बांधून आलेल्या तिघांनी ही लूट केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात भिमा हिरे (३५, रा. फुलेनगर, साक्री रोड, धुळे) या छायाचित्रकाराने दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री चंदना अहिरे यांच्यासोबत वेगवेगळ्या मोटार सायकलीने सूतगिरणीपासून मोराणे गावाकडे जात असताना बस स्थानकाजवळ मागून आलेल्या तीनजणांनी हिरे यांना थांबविले. बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या चेहऱ्यावर मिरचीपूड फेकली. रोकड, भ्रमणध्वनी, मंगळसूत्र असा मुद्देमाल बळजबरीने हिसकाविण्यात आला. यानंतर तिघेही धुळ्याकडे मोटार सायकलने निघून गेले. धुळे तालुका पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.