लोकसत्ता वार्ताहर

धुळे: भाजपचे खासदार आणि शहर जिल्हाध्यक्षांकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नसल्याने ते जातीय तेढ पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका एमआयएमचे आमदार फारुक शाह यांनी केली आहे. शहर जिल्हाध्यक्ष आमदार म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. ते कधीच पुढील दरवाजाने मंत्रालयात पोहोचू शकत नाहीत, असेही शाह यांनी म्हटले आहे.  

शहरातील ऐंशी फुटी रोडवरील चौकातील वादग्रस्त स्मारक काढल्यानंतर आमदार शाह यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. यानंतर प्रभाग क्र.१९ मधील एका रस्ता कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित शाह यांनी भाजपचे खासदार डॉ.सुभाष भामरे आणि शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यावर जोरदार टीका केली.

हेही वाचा… नाशिक: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यातील आरोपींची तपासणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल हे उगाचच आपणास आडवे येत आहेत. त्यांनी आमदारकीचे स्वप्न पाहू नये, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रभाग क्र.१९ येथे मुल्ला कॉलनी परिसरातील रस्ता काँक्रीटीकरण आणि गटार कामाच्या शुभारंभप्रसंगी एमआयएमचे नगरसेवक अमीर पठाण, युसूफ मुल्ला, अझर सय्यद, दीपा नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.