नाशिक – आयसिस या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी सातत्याने संपर्कात राहून त्यांना वित्त पुरवठा करत दहशतवादी कृत्यांना पाठिंबा दिल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शहरातील उच्चभ्रू वसाहतीतून एका अभियंता तरुणाला अटक केली. त्याच्या घरातून सात भ्रमणध्वनी, सिमकार्ड, लॅपटॉप, पेन ड्राइव्ह व संशयास्पद कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०) असे संशयिताचे नाव आहे. दहशतवाद विरोधी पथकाने तिडके कॉलनीतील बाजीरावनगर येथे ही कारवाई केली. घराच्या झडतीत अनेक भ्रमणध्वनी व सिमकार्ड, लॅपटॉप, पेनड्राईव्हसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे यंत्रणेच्या हाती लागली. संशयित शेख हा अभियंता आहे. अनेक खासगी कंपन्यांमध्ये तो भागीदार असल्याचे सांगितले जाते. भारत सरकारने बंदी घातलेल्या आयसिस या दहशतवादी संघटनेच्या तो नियमितपणे संपर्कात होता, असे एटीएसच्या तपासात उघड झाले. त्याने उपरोक्त दहशतवादी संघटनेला पैसे पुरवले. सीरियातील राबिया उर्फ उम ओसामा या आयसिसशी संबंधित महिलेमार्फत वित्त पुरवठा करत संशयिताने दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित हुजेफ शेखची न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. शेखच्या साथीदारांची अनेक राज्यांमध्ये चौकशी सुरू आहे. त्यासाठी एटीएसची पथके कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ