मकरसंक्रात जवळ येऊ लागल्याने पतंगप्रेमींचाही उत्साह वाढत असून नायलॉन मांजावर बंदी असतानाही बाजारात त्याची चोरट्या पध्दतीने विक्री होत आहे. याविरोधात सरकारवाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत पगडबंद लेन येथून एक लाख, सात हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> नाशिक: वाहून गेलेल्या बेसाल्ट शोधासाठी गोदापात्र कोरडे करणार; कुंड काँक्रिटीकरणमुक्तीसाठी काम पुन्हा सुरू करण्याची तयारी

नायलॉन मांजामुळे पशु, पक्ष्यांसह मानवालाही हानी पोहचत आहे. पोलिसांकडून सातत्याने मांजा पकडला जात असला तरी खुल्या बाजारात वेगवेगळ्या नावाने मांजाची चोरट्या पध्दतीने विक्री होत आहे. सरकारवाडा पोलीस ठाणे हद्द परिसरात पगडबंद लेन येथे जॅकी चंदनानी (३०), मनीष लेडवाणी (३३, रा. गोविंद नगर) हे दोघे नायलॉन मांजा विक्री करतांना आढळले. त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

रम्यान, घातक नायलॉन मांजा पायात अडकल्याने मंगळवारी सायंकाळी मदनलाल भुतडा ( ७०, रा. त्र्यंबकेश्वर) हे जखमी झाले. भुतडा नेहमीप्रमाणे दुपारी त्र्यंबकेश्वरहून एकटेच नाशिकला आले होते. सायंकाळी रामकुंड परिसरातील गौरी पटांगणातून जात असतांना जमिनीवर पडलेला नायलाॅन मांजा त्यांच्या पायात अडकला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. ही बाब रस्त्याने दुचाकीवर जाणारे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव (रा.इंदिरानगर) यांच्या लक्षात आली. त्यांनी आपले वाहन थांबवून भुतडा यांना गणेशवाडी येथील आयुर्वेद रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा >>> नाशिक : पक्षांतर करणाऱ्यांच्या जागी मनसेत पर्याय – अमित ठाकरे यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्याने जाधव यांनी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. भुतडा यांना १०८ रुग्णवाहिकेमार्फत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पायातून अतिरक्तस्त्राव झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान जीवघेण्या आणि बंदी घालण्यात आलेल्या नायलॉन मांजामुळे अनेकांच्या जीवावर बेतलेले असतांनाही त्याची शहरात राजरोस विक्री होत असल्याचे या घटनेतून पुढे आले आहे. पोलिसांची किरकोळ विक्रेत्यांवरील कारवाई कुचकामी ठरत असून मुख्य वितरकांचा शोध घेवून संबधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.