नाशिक – तरूणाने स्वत:चा धर्म व नाव लपवत प्रेमाचे नाटक करुन बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याची तक्रार इंदिरा नगर पोलीस ठाण्यात पीडितेने केली आहे. संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार मे ते सप्टेंबर या कालावधीत नाशिकरोड परिसरात ती राहत असतांना तिची ओळख संशयिताशी झाली. संशयिताने स्वत-चे नाव व धर्म लपवत स्वत:चे नाव विशाल जाधव असे सांगितले. तिच्यावर सातपूर येथील एका हॉटेलमध्ये अत्याचार केला. वडाळा गावात पीडितेला बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडले. तिच्याशी विवाह केला. त्यानंतर तिला परपुरूषांशी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडितेने केला. विरोध करण्याचा प्रयत्न केला असता मारहाण करण्यात आली, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित सोहेल अन्सारी (२५, रा. भारतनगर) विरूध्द फसवणुकीसह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यता आला आहे.