नाशिक शहर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी तसेच समाज कंटकांवर दहशत बसविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत शांतता समिती महत्वपूर्ण भूमिका निभावते. या समितीत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा- धुळे : शिरपूर तालुक्यात गांजाची लागवड, सात लाखांचा माल जप्त

गुन्हेगारीत युवकांचे प्रमाण लक्षणीय राहिले आहे. किरकोळ वादातून गल्लीबोळात कोयता गँग सक्रिय झाली आहे. महाविद्यालयाच्या आवाराबाहेरही दोन गटात हाणामारी होण्याचे प्रकार होत असतात. दुसरीकडे, सण, उत्सव काळात युवाशक्ती सक्रिय होत विधायक कामांसाठी पुढाकार घेत आहे. पोलीस नागरीकांच्या संरक्षणासाठी, कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रयत्न करत असतांना शांतता समितीमध्ये नागरीकांचा सहभाग वाढल्यास हे काम अधिक सुलभ होईल.

हेही वाचा- राज्यात २५ हजार उद्योजक घडविणार ; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन, औद्योगिक वसाहतीत २७ प्रकल्पांचे भूमिपूजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युवक हा देशाचा कणा असल्याने पोलीस ठाणे स्तरावर शांतता समितीमध्ये नवे सदस्य नोंदणी करण्यासाठी युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. शांतता समितीत सहभागी होण्यासाठी १८ ते २५ वयोगटातील इच्छुक युवावर्गाने नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.