पक्क्या वाहन परवान्यासाठी समान चाचणी देऊनही तुम्ही एकाला उत्तीर्ण केले आणि मला अनुत्तीर्ण असे का, एक खिडकी योजना कार्यान्वित असताना नागरिक थेट कार्यालयात कसे शिरतात, वाहन व वाहनधारकांशी निगडित सर्व कामे ऑनलाइन होऊनही परिसरात दलालांची भ्रमंती कशासाठी, प्रादेशिक परिवहनचे कर्मचारी कामाच्या वेळेत कुठे अंतर्धान पावतात.. यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात चाचणी मार्गासह कार्यालयातील वेगवेगळ्या ठिकाण सीसी टीव्ही कॅमेऱ्याची आता नजर असणार आहे. १८ ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले असून ते कार्यान्वित झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाकडून उपलब्ध झालेल्या एक लाख रुपयांच्या निधीतून कार्यालयात सीसी टीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रादेशिक परिवहन विभागात काही काम असेल तर बहुतांश नागरिक नाक मुरडतात. शासकीय लालफितीच्या कारभारावर बोट ठेवत संबंधितांकडून दलाल व तत्सम पर्याय स्वीकारले जातात. परिणामी, या कार्यालयाशी निगडित दलालांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दलालांशी सौहार्दपूर्ण संबंध असल्याने त्यात सर्वसामान्य भरडला जातो. या एकंदर स्थितीत सर्व घटकांना चाप लावण्यासाठी ही व्यवस्था महत्वपूर्ण ठरणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik regional transport cctv
First published on: 03-03-2017 at 00:35 IST