नाशिक : गणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्वत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे धरणे, तलाव यांसह इतर सर्व जलाशये काठोकाठ भरल्याने प्रशासनाच्या वतीने अशा ठिकाणी विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे. शहर परिसरातील विविध विभागात घाट, कृत्रिम हौद, कुंड विसर्जनासाठी तयार करण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी विहिरींमध्येही विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जनावेळी दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन नाशिक परिसर
नवीन नाशिक परिसरात गोविंद नगरात जिजाऊ वाचनालय, जुने सिडको येथील राजे छत्रपती व्यायामशाळा, कर्मयोगी नगर येथील राजे संभाजी महाराज व्यायामशाळेजवळ, कामटवाडा, पवन नगर येथील जलकुंभ , राजीव नगर येथील डे केअर शाळा, वासन नगर येथील गामणे मैदान, पाथर्डी फाटा येथील अंजनी लॉन्स, पिंपळगाव खांब येथील वालदेवी घाट. याशिवाय राज टॉवरच्या मागे असलेली विहीर, पाथर्डी गाव येथील विहिरीत विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिकरोड विभाग
नाशिकरोड विभागात दसक गावात गोदावरी नदी, दसक गावठाण येथील मारूती मंदिर, चेहडी गाव येथे दारणा नदी, देवळाली गाव येथे वालदेवी नदी, विहितगाव येथे वालदेवी नदी, वडनेर गाव येथे वालदेवी नदी तसेच कृत्रिम हौदांसाठी नारायणबापू चौक, राजराजेश्वरी चौक, चेहडी येथील तानाजी मालुसरे क्रीडांगण, सामनगाव रोड येथील शासकीय तंत्रनिकेतन, जयभवानी रोड येथील निसर्गोपचार केंद्रासमोरील क्रीडांगण, शिखरेवाडी मैदान, गाडेकर मळा, मनपा शाळा क्र. १२५ चे मैदान, याठिकाणी व्यवस्था करण्यात आली.
सातपूर परिसर
सातपूर परिसरात गंगापूर धबधबा, सोमेश्वर मंदिर, चांदशी पूल, आसारामबापू पूल, पाईपलाईन रोड-आनंदी आंगण जॉगिंक ट्रॅकजवळ, शिवाजी नगर येथील सूर्यामर्फी चौक, अशोक नगर पोलीस चौकीसमोर, अंबडलिंकरोड नंदिनी नदी पुलाजवळ, आयटीआय पुलाजवळ गणेशघाट येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिक पश्चिम विभाग
यशवंतराव महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, टाळकुटेश्वर पुलाजवळ, कपूरथळा पटांगण, सिध्देश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमान घाट, चोपडा ल़ॉन्स पूल, चव्हाण कॉलनी परीचा बाग, गंगापूर रोडजवळील फाॅरेस्ट नर्सरी, येवलेकर मळा येथील बॅडमिंटन हॉल, उंटवाडी राेड येथील दोंदे पूल, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, नवीन पंडित कॉलनी येथील लायन्स क्लब येथे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पंचवटीतील साधुग्राम मैदान, गंगापूर गाव येथील मलनिस्सारण केंद्र या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. कृत्रिम हौद असलेले फिरते वाहन वेगवेगळ्या विभागात फिरत राहणार आहे.
पंचवटी विभाग
याशिवाय लक्ष्मी नारायण घाट, रामदास स्वामी मठ, नंदिनी- गोदावरी संगम, पेठरोड येथील आरटीओ काॅर्नर, दत्तनगर, वाघाडी नदी, राजमाता मंगल कार्यालय, नांदुर-मानुर गोदावरी पूल, कोणार्क नगर, आडगाव पाझर तलाव, म्हसरूळ, सीता सरोवर, कपिला संगम, प्रमोद महाजन उद्यानाजवळ रासबिहारी शाळेसमोर, रामवाडी चिचंबन, कमलनगर, रोकडोबा सांडवा ते गौरीपटांगण परिसरसह रामकुंड परिसर, गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्वर पूल, आडगाव पाझर तलाव येथेही विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे.