लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : देहविक्री करणाऱ्या महिलांच्या समस्या, अडचणी समजून घेत त्यांची मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे राहतील, यासाठी शासकीय आस्थापना, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने काम होणे गरजेचे आहे. यासाठी या महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलावा, असा सूर देहविक्री करणाऱ्या महिला आणि त्यांची मुले- प्रश्न आणि आव्हाने या विषयावर येथे आयोजित राष्ट्रीय परिसंवादातून निघाला.

राष्ट्रीय महिला आयोग आणि प्रवरा अभिमत विद्यापीठ यांच्या वतीने राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाचे उद्घाटन प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) शिवाजी इंदलकर, गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, आसावरी देशपांडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. उद्घाटन सत्रात डॉ. मगरे यांनी विद्यापीठाची भूमिका मांडली. देहविक्री करणाऱ्या महिलांसमोरील अडचणी, त्यांच्या मुलांचे प्रश्न याकडे लक्ष वेधले. या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय आस्थापनांनी एकत्र येऊन काम करावे, अशी सूचना त्यांनी केली. न्या. इंदलकर यांनी प्रभावित महिलांना कायदेशीर मदत लागल्यास न्यायालयात कार्यालयीन वेळेत कधीही या. असे आश्वासन दिले. नाकाडे यांनी महिलांना कुठल्याही आस्थापनां विषयी काही अडचण असेल, योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचण येत असेल तर संपर्क करा, असे आवाहन केले.

आणखी वाचा-धुळ्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड बळकावणारी टोळी; दोघांना अटक, आठ जणांविरुध्द गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्घाटन सत्रानंतर सहेली संघाच्या तेजस्वी सेवेकरी यांनी देहविक्री करणाऱ्या महिला, त्यांचे अधिकार आणि अडचणी या विषयावर, मत मांडताना कायद्यातील वेगवेगळ्या कमतरतेवर बोट ठेवले. न्यायालयाने व्यवसाय म्हणून मान्य केले असले तरी हे काम करणाऱ्या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही दुषित आहे. या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस, महिला बालविकास विभाग आणि अन्य आस्थापनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. संतोष शिंदे यांनी बाल हक्कांविषयी माहिती दिली. डॉ. आनंद पाटील यांनी संबंधित महिलांचे मानसिक आरोग्य, त्यांना व्यवसायामुळे जडणारे आजार, याकडे लक्ष वेधले. राहुल जाधव यांनी संबंधित महिलांच्या मुलांचे भावविश्व, त्यांची होणारी फरफट, त्यांची ओळख याविषयी भाष्य केले. बाल कल्याण मंडळाच्या डॉ. शोभा पवार यांनी बालकांचे हक्क व त्यांचे प्रश्न याविषयी माहिती दिली. देहविक्री करणाऱ्या महिलांच्या बालकांचे प्रश्न याविषयी प्राचार्य विलास देशमुख, ॲड.. रवींद्र निकम, महिला बाल विकास विभागाचे आयुक्त चंद्रशेखर पगारे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.