शुरा मी वंदिले व प्रिये पाहा, रात्रीचा समय सरूनी या नाट्यपदांसह पंडित भीमसेन जोशींनी अजरामर केलेले माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी यांसह विविध भक्तिगीतांनी जळगावकरांची पाडवा पहाट ही स्वरोत्सवाने प्रसन्न आणि मंगलमय झाली. निमित्त होते चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या स्वरोत्सव या पाडवा पहाट कार्यक्रमाचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मतदारांशी संपर्क साधण्यासाठी फराळ, आकाशकंदील, पणत्यांचा वापर

शहरात दीपावलीनिमित्त प्रातःकालीन स्वरोत्सव साजरा करण्याची परंपरा (स्व.) वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे गेल्या वीस वर्षांपासून सुरू करण्यात आली. या स्वरोत्सवाची सुचिर्भूतता, चैतन्य, मांगल्य, रेखीव रांगोळ्या उपस्थितांचे मन प्रसन्न करते. कलावंतांनाही यापेक्षा जास्त काय हवे असते? बुधवारी महात्मा गांधी उद्यानाच्या कस्तुरबा रंगमंचावर मान्यवरांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने मैफल सजली.

कलाकार होती चेन्नई येथील तरुण आश्‍वासक गायिका दीपिका वरदराजन. वरुण नेवे यांच्या गुरुवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कलाकार दीपिका वरदराजन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, प्रायोजक डॉ. राहुल महाजन, मेजर नानासाहेब वाणी, महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. कलावंतांचा सत्कार नानासाहेब वाणी, डॉ. विवेकानंद, प्रतिष्ठानचे विश्‍वस्त प्रा. शरदचंद्र छापेकर व डॉ. अपर्णा भट यांनी केला. दीपिकाच्या मातोश्री गीता वरदराजन या विशेषकरून या मैफिलीस उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी केला. दीपक चांदोरकर यांनी परिचय करून दिला. त्यानंतर सुरू झाला एक सुरेल प्रवास.

हेही वाचा- नाशिक : फटाक्यांमुळे इमारतीच्या गच्चीला आग

दीपिकाने आपल्या मैफिलीची सुरुवात राग ललतने केली. विलंबित एकतालात निबद्ध गुरू ही आये तर छोटा ख्याल तीनतालात निबद्ध भवंदा या नंदा जो बन मोरा सैया बुलाई नदिया आधी रात ही ठुमरी सादर केली. यानंतर दीपिकाने देस रागातील सं. मानापमान नाटकातील गोविंदराव टेम्बे यांनी संगीतबद्ध केलेले शुरा मी वंदिले हे नाट्यपद सादर केले. त्यानंतर सं. सौभद्र या नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीतबद्ध करून पंडित प्रभाकर कारेकर यांनी गाऊन अजरामर केलेले प्रिये पाहा, रात्रीचा समय सरूनी हे नाट्यपद सादर केले. पंडित भीमसेन जोशींनी अजरामर केलेले माझे माहेर पंढरी, आहे भीमरेच्या तीरी हे भक्तिगीत सादर केले. यानंतर सं. मत्स्यगंधा नाटकातील देवा घरचे ज्ञात कुणाला हे नाट्यपद सादर केले. तिन्ही सांजा सख्या मिळाल्या भय इथले संपत नाही.

हेही वाचा- शिर्डीतील साईबाबा मंदिराला अनंत अंबानींची दीड कोटींची देणगी

दीपक चांदोरकर यांनी आभार मानले. रसमे उलफत को निभाये कैसे या गीतानंतर भैरवीने मैफलीची सांगता झाली. तबल्यावर नाशिक येथील गौरव तांबे, संवादिनीवर पुष्कराज भागवत यांनी साथसंगत केली. तानपुर्‍यावर अथर्व मुंडले व वरुण नेवे यांनी साथसंगत केली. प्रसन्न भुरे, अथर्व मुंडले, वरुण नेवे, आशिष मांडे, निनाद चांदोरकर, वरुण देशपांडे, स्वानंद देशमुख यांनी नियोजन केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padwa pahat music program organized in jalgaon nashik dpj
First published on: 26-10-2022 at 17:05 IST