लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: आपल्या नव्या पुस्तकात अशोक देवदत्त टिळक यांचा उल्लेख असलेला लेख आहे. आज त्यांच्याच नावाने पुरस्कार मिळत असल्याचा विशेष आनंद होत आहे. अशा पुरस्कारांमुळे कला निर्मिती करण्याचा आनंद मिळतो. अशी भावना चित्रकार सुहास बहुलकर यांनी व्यक्त केली.

येथील सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेतर्फे २०२२ चा चरित्रात्मक कादंबरी (अशोक देवदत्त टिळक) वाड:मयीन पुरस्कार बहुलकर यांना सांस्कृतिक समितीचे कार्याध्यक्ष खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बहुलकर यांनी विशिष्ट चित्रकार, विशिष्ट विचारधारा घेऊन चित्र काढतात, असे सांगितले. वाडा संस्कृतीवरील चित्रांना फार मागणी असून आपल्या पुढील पुस्तकात शिवाजी महाराजांची सर्व चित्रे, पुतळे यांचा आढावा घेतलेला असल्याचे त्यांनी सांगितले. वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयातील वस्तूंची आणि चित्रांची माहिती जाणून घेतली. या वस्तूसंग्रहालयासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा… Video : कांदा आंदोलनात आता व्यंगचित्रांचाही वापर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खा. सहस्त्रबुध्दे यांनी नाशिक ही आपली जन्मभूमी आणि सार्वजनिक वाचनालय हे श्रद्धास्थान असल्याचे सांगितले. बहुलकर यांनी चित्रकलेत एकच शैली न हाताळता प्रत्येक प्रकारच्या चित्रांच्या शैलींचा अभ्यास करून त्यात प्रभुत्व प्राप्त केले आहे. चित्राबरोबरच लेखनातही त्यांचे योगदान आहे. त्यामुळेच सावानासारख्या संस्थेचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे, असे त्यांनी सांगितले. पुरस्कार सोहळ्यास वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.