सीएनजी दरवाढी विरोधात राष्ट्र्वादी युवक काँग्रेसचे काळे सोने वाटून आंदोलन | Protest against CNG price hike Nationalist Youth Congress black gold nashik | Loksatta

सीएनजी दरवाढी विरोधात राष्ट्र्वादी युवक काँग्रेसचे काळे सोने वाटून आंदोलन

सद्यस्थितीत डिझेलच्या किंमतीपेक्षा सीएनजीची किंमत जास्त झाल्यामुळे वाहनधारकांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

सीएनजी दरवाढी विरोधात राष्ट्र्वादी युवक काँग्रेसचे काळे सोने वाटून आंदोलन
सीएनजी दरवाढी विरोधात राष्ट्र्वादी युवक काँग्रेसचे काळे सोने वाटून आंदोलन

नाशिक : सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल–डिझेलला पर्याय म्हणून वाहनधारक नैसर्गिक वायूधारीत वाहनांकडे वळत असताना आता या गॅसची किंमतही झपाट्याने वाढत असल्याने या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सीएनजी पंपांवर ग्राहकांना आपट्याची काळी पाने देऊन उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.दसऱ्याच्या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतिक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. महागाईमुळे नागरिकांच्या सर्वच सणोत्सवावर पाणी फेरले गेले असताना मोदी सरकार विविध माध्यमातून जनतेला महागाईच्या खाईत ढकलत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांचा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांकडे कल आहे.

सद्यस्थितीत डिझेलच्या किंमतीपेक्षा सीएनजीची किंमत जास्त झाल्यामुळे वाहनधारकांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. महामार्ग सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. सर्व वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना त्यात सीएनजी गॅसच्या दरवाढीची भर पडली. नाशिक शहरात सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सीएनजी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. सीएनजी गॅस दरात मोदी सरकारने सतत वाढ केली. नव्या दरवाढीमुळे ९२ रुपये प्रति किलोवरून सीएनजी गॅस ९६ रुपयांवर पोहचल्याने वाहनधारक संतप्त झाले आहेत.

हेही वाचा : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकर वैतागले

नागरिकांवर भार वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री सत्कार स्वीकारण्यात व विविध सणांच्या आनंदोत्सवात व्यस्त असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. वाढती महागाई, अतिवृष्टीने झालेले पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व नागरिकांच्या इतर प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली. यावेळी बाळा निगळ, जय कोतवाल, विशाल डोके, नीलेश भंदुरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Dasara Melava 2022: विचित्र हातवारे करणाऱ्या शिंदे गटातील समर्थकांना ठाकरे गटातील महिलांचा चोप

संबंधित बातम्या

राख्यांच्या किमतीत २० टक्क्य़ांनी वाढ तरी उत्साह कायम
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जळगाव जिल्ह्यातून २३० बसेसची नोंदणी
नाशिक : आठवडाभरात कांदा दरात ५०० रुपयांची तेजी, चांगल्या प्रतीच्या मालाची आवक घटल्याचा परिणाम
‘‘नाशिकरोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणावे’’,अन्यथा… मनसे कार्यकर्त्यांचा इशारा
“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“MPSC त उत्तीर्ण नाही झाला तरी गावाकडे…”, गोपीचंद पडळकरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
पुण्यातून व्यापाऱ्याचे अपहरण करणारा आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद; प्रेमसंबंधातून अपहरणाचा प्रकार
शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम
पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू