महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महानगर शाखेतर्फे बुधवारी ठाणे शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोर गल्लोगल्ली रस्ते आंदोलनास प्रारंभ झाला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरत महापालिका प्रशासनासह सत्ताधार्‍यांचा निषेध केला.

हेही वाचा- ठाणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची कार्यालयांना पुन्हा टाळे; महापालिकेच्या प्रशासनाची कारवाई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे घे भरारी- मनसे आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गल्लोगल्ली रस्ते आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांनी केले. आंदोलनात महापालिका प्रशासनासह सत्ताधार्‍यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे म्हणाले की, मनसेतर्फे घे भरारी उपक्रम महाराष्ट्रभर राबविला जात आहे. त्याअंतर्गत शहरातील प्रमुख समस्यांचा मुद्दा घेत तो सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. या उपक्रमांतर्गत शहरात माझा प्रभाग-माझा रस्ता ही जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्या जळगावकरांचा प्रमुख मुद्दा रस्ते आहेत. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून रस्त्यांची समस्या कायम असून, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे जळगावकर मणक्यांसह विविध आजारांनी बेजार झाले आहेत. धुळीमुळे श्‍वसनाचे आजार होत आहेत. जिल्ह्यात दोन वजनदार मंत्री असूनही रस्त्यांची समस्या जैसे थे आहे. या दोन्ही मंत्र्यांनी जळगावकरांना रस्त्यांच्या समस्या सोडवून न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे.

हेही वाचा-डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती विभागातील महिलांचे एक हजार दिवस समुपदेशन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिष सपकाळे म्हणाले की, सध्या रस्त्यांची दैना झाली आहे. खड्डेमय रस्त्यांनी, तसेच धुळीने जळगावकर विविध आजारांनी बेजार झाले आहेत. वाहने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी गल्लोगल्ली रस्ते आंदोलन केले जात आहे. आंदोलनात शहरातील दुकानदारही आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले