नाशिक येथील ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्यालयात दोन जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता नाशिक ग्रामीणसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
हेही वाचा- नंदुरबार: बांधकाम मजुरांच्या वाहनाला अपघात; दोन महिलांचा मृत्यू
आडगांव येथील पोलीस मुख्यालय परिसरात रिक्त पदांसाठी पोलीस प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेत पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांनी नाशिक ग्रामीण येथे भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज भरलेले आहेत. त्यांना महाआयटी कडून प्रवेशपत्र पाठविण्यात आलेले आहेत. संबंधित उमेदवारांनी ओळखपत्राच्या दोन प्रती, आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती, सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रतींचा संच तसेच आवेदन अर्जावर सादर केलेल्या छायाचित्राच्या पासपोर्ट साईजच्या सहा छायाचित्रांसह त्यांना बोलावलेल्या दिवशी सकाळी सहा वाजता आडगाव पोलीस मुख्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
