जळगाव : भाडे आणि सुरक्षा ठेव निर्धारण समितीत गाळेधारक संघटनेचा प्रमुख प्रतिनिधी सदस्य म्हणून घ्यावा, निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक प्रयोजनासाठी वर्तमान बाजारमूल्य दोन टक्के भाडे राहील असे स्पष्ट नमूद करावे, व्यवसाय आणि औद्योगिक प्रयोजनासाठी वर्तमान बाजारमूल्याच्या तीन टक्के भाडे राहील हे स्पष्ट आदेश करावेत यांसह भाडेपट्ट्याच्या रकमेत दर पाच वर्षांनी सुधारणा करावी यांसह १३ हरकतींच्या मुद्यांचे पत्र गाळेधारक संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

हेही वाचा… Video : कांदा आंदोलनात आता व्यंगचित्रांचाही वापर

हेही वाचा… नाशिक : द्राक्षबागेवर घाव घालून नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाने राज्यातील मुदत संपलेल्या महापालिकांच्या गाळेधारकांसाठी नवीन सुधारित नियमावली जाहीर केली होती. या अधिसूचनेवर महिनाभरात हरकत घेण्यास सांगितले होते. जळगाव शहरासह महाराष्ट्रातून चार ते पाच हजार गाळेधारकांनी हरकती टपालाद्वारे व समक्ष मंत्रालयात जाऊन दाखल केल्या. पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव महानगर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्यासह राजस कोतवाल, ॲड. अमित सोनवणे, तेजस देपुरा, सुरेश पाटील आदींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेऊन हरकतींच्या मुद्द्यांचे पत्र सादर केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकार्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी हरकतींबाबत माहिती घेत त्यांच्यावर निश्चितच विचार करण्यात येईल, असे सांगितले.