नाशिक – जिल्ह्यात एकाच वेळी ४६ दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलिसांनी छापे टाकले. छाप्यात १० लाख रुपयांची दारू, रसायन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

गुरुवारी पहाटे ग्रामीण पोलिसांच्या सुमारे ५०० अधिकारी, अमलदारांनी गावठी दारू गाळप करणाऱ्या ४६ ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला. महाराष्ट्र दारुबंदी कायद्याखाली ३४ गुन्हे दाखल करण्यात आले. छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये कळवण ११, वाडीवऱ्हे पाच, मालेगाव तालुका चार, सुरगाणा, घोटी, देवळा, सटाणा, जायखेडा आणि इगतपुरी प्रत्येकी तीन, निफाड आणि पेठ दोन, सिन्नर, अभोणा, वणी आणि त्र्यंबकेश्वर प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे. या कारवाईत रसायन तयार करण्यासाठी लागणाऱ्या गुळ विक्रेत्यांवरही कारवाई करून सटाणा तालुक्यातील ठेंगोडा, देवळा तालुक्यातील लोहणेर गावातून मोठ्या प्रमाणावर काळा गुळ आणि नवसागर जप्त करण्यात आला.

हेही वाचा – “फुटलेल्या शिंदे गटातही दोन गट…”, संजय राऊतांचा मोठा दावा; कीर्तीकरांच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले, “भाजपा अजगर…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवैध व्यवसाय रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी १२ विशेष पथके गठीत केली आहेत. त्यांच्या मदतीने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यावर छापे टाकण्यात येत आहे. नागरिकांनी या संदर्भात माहिती असल्यास ६२६२२५६३६३ या मदतवाहिनीवर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नमूद केले आहे.