लोकसत्ता वार्ताहर
नंदुरबार: शहादा शहरातील प्रकाशा वळणरस्त्यावरील एका मोटार दालनाला रात्री लागलेल्या आगीत सहा ट्रॅक्टरसह अनेक वस्तु जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
प्रकाशा वळण रस्त्यावर मोलाई राज मोटार हे ट्रॅक्टरचे दालन आहे. या दालनाला रात्री आग लागली. स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने दालनातील ट्रॅक्टर आणि इतर शेती साहित्य खाक झाले.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज दालन मालकांने व्यक्त केला. शहादा नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबांनी दोन तासापेक्षा अधिक वेळ परिश्रम केल्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीत सहा टॅक्टर, एक चारचाकी, आठ इलेक्ट्रिक मोटार सायकल, दोन जनरेटर, दोन इंधन इंजीन, चार कटर मशीन जळून खाक झाले.