नंदुरबार – जिल्हा परिषदेत उशिरा येणारे, तसेच हजेरी लावून गायब होणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी झाडाझडती घेतली.

जिल्हा परिषदेत अनेक अधिकारी, कर्मचारी वेळेवर कामावर येत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. अशातच दुपारच्या भोजनानंतर अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयातून निघून जातात. या प्रवृत्तीला चाप बसून जनसामान्यांच्या कामांना गती देण्यासाठी अध्यक्षा सुप्रिया गावितांनी मुख्याधिकारी रघुनाथ गावडे यांना सोबत घेत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सर्वच विभागांची झाडाझडती घेतली. अध्यक्षांनी प्रत्येक विभागात जावून हजेरी पुस्तिकेची पाहणी करून उपस्थित कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. 

Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान
buldhana vanchit bahujan aghadi marathi news
“वंचितचा खासदार सतीशदादा पवार!”, युवा जिल्हाध्यक्षांच्या ‘पोस्ट’ने चर्चांना उधाण; म्हणाले, “वरून मेसेज आल्यामुळे…”
bjp candidate sudhir mungantiwar started campaign for lok sabha from chandrapur
सुधीर मुनगंटीवारांचा प्रचार सुरू; काँग्रेस नेते उमेदवारीसाठी मुंबई, दिल्लीत अन् तेली समाजाच्या उमेदवाराची एन्ट्री!

हेही वाचा – जळगाव : ट्रॅक्टरने चिरडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, वाळूमाफियांवर नातेवाईकांचा आरोप

यावेळी त्यांनी प्रत्येक टेबलजवळ जावून अधिकारी, कर्मचारी हजर राहतात की नाही, कोणाकडे किती निर्णय प्रलंबित आहेत, याचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी यावेळी कर्मचारी, अधिकाऱ्यांना काम करताना काही त्रास अथवा अडचणी आहेत का, याचीही विचारणा केली. यामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.

हेही वाचा – नाशिक : त्र्यंबकेश्वरात संत निवृत्तीनाथ यात्रोत्सवास सुरुवात; वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण

अध्यक्षा या रात्री आठपर्यंत मुख्यालयात थांबून प्रलंबित कामे मार्गी लावत असल्याचे चित्र होते. वडील डॉ. विजयकुमार गावित हे पालकमंत्री तर बहीण डॉ. हिना गावित खासदार असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामे लोकांपर्यंत कशी पोहचतील, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या तपासणी दौऱ्यायावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, जि. प. सदस्य भरत गावित, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार आदी उपस्थित होते.