शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे राणे पिता-पुत्रांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यात आमदार नितेश राणे यांनी सुषमा अंधारेंचा एक व्हिडीओ ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्या हातात शिवबंधन? सांगा सत्तेसाठी कुणी केली गद्दारी? असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे. याला सुषमा अंधारेंनी पलटवार करत राणे पुत्रांचे संस्कार काढले आहेत.

सुषमा अंधारे नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. “नितू आणि निलू ही प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यांचा अभ्यास कमी आहे, कारण नारायण राणेंनी त्यांना संस्कार दिले नाहीत. नितेश राणेंनी ट्विट केलेला व्हिडीओ २० वर्षापूर्वीचा आहे. कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने त्यांची कानशिल लाल झाली आहे. त्यामुळे त्याचं अस्थिर होणं स्वाभाविक आहे,” असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला.

हेही वाचा : “त्यांची मानसिकता ढळली आहे, नैराश्यातून…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; ‘कंटेनरभरून खोक्यां’चा केला उल्लेख!

सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. “गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरल्याचं वारंवार सिद्ध होत आहे. फडणवीसांना विसर पडतो की ते राज्याचे गृहमंत्री आहेत. मात्र, ते एका पक्षाचे पदाधिकार आणि गृहमंत्री असल्यासारखे वागतात,” असे टीकास्त्र सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर सोडलं आहे.

हेही वाचा : “मी कुठेतरी वाचलंय, रेडा हे…”, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “पाच महिन्यांपूर्वी आम्ही वाघ होतो!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटातील काही लोक स्वातंत्र्यवीर यांच्या मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक होतात. तीच लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तलवारी म्यान करून चकार शब्द काढत नाहीत. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल आहे की भाजपाचे पूर्णवेळ कार्यकर्ते, याचं उत्तर दिलं पाहिजे. कारण भगतसिंह कोश्यारी ठरवून बदनामी करतात,” असा आरोपही सुषमा अंधारेंनी केला आहे.