शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित महाप्रबोधन यात्रेनिमित्त मुक्ताईनगरमध्ये शुक्रवारी सायंकाळी उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभेस जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली नसतानाही मुक्ताईनगर कडे जाण्यासाठी निघालेल्या अंधारेंना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. त्यानंतर त्यांनी समाज माध्यमातून त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नाशिक रेल्वेस्थानकात शालिमार एक्स्प्रेसच्या मालवाहू डब्याला आग

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित महाप्रबोधन यात्रेनिमित्त जिल्ह्यातील शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बुधवारपासून जाहीर सभा घेण्यात आल्या. पहिली सभा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगावात झाली. त्यानंतर पाचोरा, पारोळा व चोपडा येथे सभा झाल्या. शुक्रवारी मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात अंधारेंची सभा होणार होती. तत्पूर्वी, गुरुवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सभा रद्दचे आदेश दिले असल्याने अंधारेंना सभेला मुक्ताईनगर येथे जाण्यापासून रोखले.

हेही वाचा >>>नाशिक : बहिणीकडे वाईट नजरेने पाहिले म्हणून सुरक्षारक्षकाचा केला खून ; संशयित ताब्यात

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सायंकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा ठाकरे गटाच्या उपनेत्या अंधारे मुक्कामी नाशिक : बहिणीकडे वाईट नजरेने पाहिले म्हणून सुरक्षारक्षकाचा केला खून ; संशयित ताब्यातथांबलेल्या हॉटेलजवळ तैनात होता. हॉटेलमध्ये अंधारे यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत व स्थानिक पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांसोबत बैठक घेऊन सभेबाबत बाजू मांडली. सायंकाळी साडेपाचपासून साध्या गणवेशातील महिला पोलीस हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावर व अंधारेंच्या कक्षाबाहेर तैनात होत्या. सायंकाळी सात-साडेसातच्या सुमारास अंधारे या संजय सावंत व उपस्थित स्थानिक पदाधिकार्‍यांसह मुक्ताईनगरकडे जाण्यास निघाल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा >>>आजपासून ग्रामीण साहित्य संमेलन – परिसंवाद, व्याख्यान, कविसंमेलनाचा समावेश

अंधारे या मुक्ताईनगर येथे सभेला जाण्यासाठी निघाल्या, त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. तुम्हाला सभेला जाता येणार नाही, असे सांगत पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. दरम्यान, हॉटेलबाहेर अंधारेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत, पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचा आरोप करीत आपण दूरदृश्य प्रणालीद्वारे जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले. मुक्ताईनगर येथील सभेपासून जाण्याला पोलिसांनी रोखल्यामुळे अंधारेंनी पालकमंत्र्यांवरही टीकास्त्र सोडले. पालकमंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. माझा पोलिसांवर राग नसून ते केवळ आदेशाचे पालन करीत आहेत. संविधानाने मला सभा घेण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, ये डर मुझे अच्छा लगा, अशा शब्दांत त्यांनी पालकमंत्र्यांवर घणाघात केला.नंतर त्या पुन्हा हॉटेलमध्ये गेल्या. त्यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास महाप्रबोधन यात्रेच्या फेसबुक पेजवरून दृरदृश्य प्रणालीद्वारे सभा घेतली. या काळात ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांसह शिवसैनिकांनी मुक्ताईनगरसह तालुक्यातील ग्रामीण भागात लिंक पाठविण्यात आल्या.

हेही वाचा >>>‘सत्ताधार्‍यांकडून दबावतंत्राचा वापर’; शरद कोळी प्रकरणावरुन अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका

मुक्ताईनगरमध्ये शिवसैनिकांवर कारवाई.
जिल्हा प्रशासनाने महाप्रबोधन यात्रेला परवानगी नाकारूनही सभा घेण्याची तयारी करणार्‍या शिवसैनिकांवर पोलिसांनी कारवाई केली. गुरुवारी रात्री उशिरा मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन यात्रा आणि महाआरती या दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली. यानंतर शुक्रवारी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाप्रबोधन सभास्थळीच ठाण मांडून होते. काहीही झाले तरी सभा होणारच असल्याचा त्यांचा पवित्रा होता. सभेसाठी लागलेले व्यासपीठ आणि अन्य बाबी हटविण्यात आल्या. यानंतर संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, जिल्हा संघटक गजानन मालपुरे आदी पदाधिकारी मुक्ताईनगर येथे गेले. त्यांनी युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख पवन सोनवणे आणि त्यांच्या सहकार्‍यांसह चर्चा करीत मुक्ताईनगरमधील गोदावरी मंगल कार्यालयातील सभागृहात सभा घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी तेथेही परवानगी नाकारली. याप्रसंगी शिवसैनिक आणि पोलीस प्रशासनामध्ये शाब्दिक चकमकही उडाली. सायंकाळी पोलिसांनी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सर्वांना पोलीस ठाण्यात चौकशी करून नंतर सोडून देण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पदाधिकार्‍यांमध्ये पक्षाचे संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, जिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, दीपकसिंग राजपूत व समाधान महाजन, ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर खैरनार, युवासेने जिल्हा उपप्रमुख पवन सोनवणे आदींचा समावेश होता.सुषमा अंधारे दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलणार असल्याचे सावंत यांनी सांगितल्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले.

हेही वाचा >>>जळगाव: शरद कोळींविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपांत तथ्य नाही: मंत्री पाटील.
कोणत्याही पक्षाला महाप्रबोधन करण्याचा व त्यांच्या नेत्यांना प्रचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार कमी, तर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार अधिक होत असल्याचा आरोप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. मुक्ताईनगरात महाआरतीही होणार होती. मात्र, त्या आरतीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. शिवाय, इतर सभांना पोलीस, जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शासनाच्या दबावाखाली या सभेची परवानगी नाकारण्यात आली, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

हेही वाचा >>>पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयासाठी विधानसभा उपाध्यक्षांना ‘खो’

सुषमा अंधारे बीडकडे रवाना.
सुषमा अंधारे यांनी बुधवारपासून जिल्ह्यातील शिंदे गटातील मतदारसंघांत जाहीर सभा घेऊन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील आणि पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावर वाक्बाण सोडले. दरम्यानच्या काळात राजकारणाला वेगळे वळण मिळाले. आता जिल्ह्याच्या दौर्‍यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे रात्री बीड जिल्ह्यातील परळीकडे रवाना झाल्या. यावेळी सुषमा अंधारेंच्या मोटारींच्या ताफ्यावर कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करीत जोरदार घोषणाबाजी केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare speech on social media after being denied permission to hold a public meeting amy
First published on: 05-11-2022 at 11:40 IST