पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी येथील कलाश्री गुरुकुल आणि लोकहितवादी मंडळ यांच्या सहकार्याने शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात स्वराधिराज या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात भीमसेन जोशी यांची संपूर्ण गानयात्रा सादर होणार आहे. त्यात ज्येष्ठ गायक डॉ. आशिष रानडे यांचे शास्त्रीय गायन, तसेच अभंग होणार आहे.

भारतीय संगीत क्षेत्रात भीमसेन जोशी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. शास्त्रीय संगीत भक्तीरसातून जनसामान्यापर्यंत रुजविण्यात आणि भक्तीसंगीत रसिकांच्या ओठांवर रूळवण्यात या दिग्गज गायकाचा फार मोठा वाटा आहे. या ऋषीतुल्य व्यक्तीच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पं. भीमसेन जोशी यांचा सांगीतिक वारसा लाभलेले आनंद भाटे यांचे शिष्य डॉ. आशिष रानडे हे महोत्सवात आपली गायकी सादर करणार आहेत.

हेही वाचा – नाशिक: उमराणेजवळ बस-मालमोटार अपघातात; ४० प्रवासी जखमी

हेही वाचा – नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची हप्तेखोरी उघड; हॉटेल व्यावसायिकाकडून लाच घेताना तिघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमाला तबल्याची साथसंगत सौरभ क्षीरसागर, हार्मोनियमवर दिव्या रानडे, पखवाजवर दिगंबर सोनवणे, तालवाद्य अमित भालेराव यांची असणार आहे. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा रत्नपारखी करणार आहे. नाशिककरांकडून आदरांजली अर्पण करण्यासाठी रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कलाश्रीचे संचालक डॉ. आशिष रानडे यांनी केले आहे.