नाशिक – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह चित्रफितीवरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मंगळवारी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात सोमय्या यांचा आंदोलनाव्दारे निषेध करण्यात आला.

विरोधी पक्षातील नेत्यांच्या गैरव्यवहारांच्या प्रकरणांवरुन रान उठविणारे सोमय्या आक्षेपार्ह चित्रफितीमुळे टिकेचे धनी झाले आहेत. विशेषत्वाने ठाकरे गट याप्रकरणी अधिक आक्रमक झाला आहे. नवीन नाशिक, शालिमार या ठिकाणी ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालया समोर महिला आघाडीच्या वतीने सोमय्या यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. महिला पदाधिकारी वृषाली सोनवणे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सातत्याने ईडीची धमकी देणाऱ्या सोमय्या यांचा खरा चेहरा समोर आला असून तो कोणत्या प्रवृत्तीचा माणूस आहे हे त्याच्या घाणेरड्या कृत्यावरून सिध्द झाले असल्याचे सांगितले. यावेळी ज्योती भागवत, हर्षा बडगुजर, स्वाती पाटील, अलका गायकवाड आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>नाशिक: मंत्रिपद मिळाल्याने निधीची चिंता मिटली ,येवल्यातील ३६ कोटींची कामे पुरवणी अर्थसंकल्पात सामील

हेही वाचा >>>धुळ्याजवळ जुगार अड्ड्यावर पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाचा छापा, ३१ जण ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंचवटी कारंजा येथेही ठाकरे गटातर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारात सोमय्या यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. शासनाने त्यांच्याविरोधात कारवाई करावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख सुनील पवार, तालुकाप्रमुख बापू जाधव , माजी तालुका प्रमुख ॲड. वसंत सोनवणे उपस्थित होते.