इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन शिवारात चोरट्यांनी वाहनचालकाला मारहाण करत मद्याने भरलेला कंटेनर असा ६३ लाख, २९ हजार ८५६ रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहमंद अबुलजैस शेख (२२स रा. उत्तर प्रदेश) हा औरंगाबादूहून कंटेनर घेऊन निघाला होता. कंटेनरमध्ये ४३,२९,८५६ रुपयांची २२०० मद्याची खोकी होती.

हेही वाचा >>>जळगाव: सुषमा अंधारेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पालकमंत्र्यांविरोधात ठाकरे गटाची निदर्शने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधल्या प्रवासात कंटेनरमध्ये संशयित बसले. त्यांनी वाहन नाशिक, सिन्नरमार्गे नेण्यास सांगितले. एका पेट्रोल पंपाजवळ वाहन थांबले असता संशयितांनी शेख याला दमदाटी करत मारहाण केली. शेख याला नाशिक तसेच हरसूल येथे नेऊन तेथे सोडून दिले. शेख यांच्या ताब्यातील कंटेनर आणि मद्याच्या खोक्यांसह चोरट्यांनी पोबारा केला.