लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: घरात झोपलेल्या वृध्द दाम्पत्याला धाक मारहाण करीत दागिने, रोख रक्कम असा एक लाख, ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दिनकर चहाळे यांच्या घरात त्यांचे आई-वडील वरच्या खोलीत झोपले असताना चार संशयितांनी घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले एक लाख रुपये, सात हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र, १० हजार रुपयांचे मंगळसूत्र तसेच इतर दागिने असा एक लाख, ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.