उपनगर नाका ते  कालवा रस्त्यालगत मोठया प्रमाणात गळती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्रातून नाशिकरोड विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीत उपनगर नाका ते आम्रपाली झोपडपट्टी कालवा रस्त्यालगत मोठया प्रमाणात गळती होत आहे. या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करावी लागणार असल्याने नाशिकरोड विभागातील अनेक भागांत गुरुवारी दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी दुपारनंतरचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे. प्रभाग क्रमाक १७ मधील कालवा रस्ता परिसर, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसकगाव, शिवाजीनगर, एमएससीबी कॉलनी, तिरुपतीनगर, टाकळी रोड, भीमनगर, प्रभाग क्रमांक १८ मधील शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गांव, सायखेडा रस्ता, भगवा चौक, शिवशक्तीनगर.

प्रभाग १९ मधील गोरेवाडी, चेहडी, नाशिक-पुणे महामार्ग परिसर, एकलहरा रस्ता, सामनगाव, चाडेगांव पंपिंग परिसर, प्रभाग २० मधील पुणे रस्ता, रामनगर, विजयनगर, शाहूनगर, लोकमान्यनगर, मोटवाणी रोड, कलानगर, आशानगर, जिजामातानगर, तसेच प्रभाग २१ मधील जयभवानी रस्ता, सहाणे मळा, लवटेनगर एक व दोन, तोफखाना केंद्र रस्ता, दत्तमंदिर रस्ता, धोंगडेनगर, जगताप मळा, तरण तलाव परिसर, चव्हाण मळा, फर्नाडिसवाडी, भालेराव मळा, जाचकनगर, नंदनवन कॉलनी, आवटेनगर, गोसावीवाडी, राजेंद्र कॉलनी, आनंदनगर, आडकेनगर आणि प्रभाग क्रमांक २२ मधील रोकडोबावाडी, डोबी मळा, सुंदरनगर, डावखरवाडी, जयभवानी रस्ता, अश्विनी कॉलनी, जेतवननगर, बिटको महाविद्यालय तरणतलाव,  सौभाग्यनगर, बागूलनगर, देवळाली गांव, मालधक्का रस्ता, गाडेकर मळा, एम. जी. रोड, गिते मळा, खर्जुल मळा, विहित गांव या भागांत गुरुवारी पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने नमूद केले आहे.

  • नाशिकरोड विभागातील अनेक भागांत गुरुवारी दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी दुपारनंतरचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
  • गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्रातून नाशिकरोड विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीत उपनगर नाका ते आम्रपाली झोपडपट्टी कालवा रस्त्यालगत मोठया प्रमाणात गळती
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply cut off tomorrow ysh
First published on: 26-01-2022 at 00:02 IST