नाशिक – गेल्या निवडणुकांमध्ये अनेक लोक आपल्या विरोधात उभे राहिले होते. येवल्याच्या जनतेने मात्र त्यांचा दोर कापला. आगामी निवडणुकीत ज्यांची इच्छा आहे. त्यांनी विरोधात लढावे. त्यांचा पतंग जनतेच्या बळावर नक्कीच कापू, असा दावा राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने येवला येथे आयोजित पतंगोत्सवात भुजबळ यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला. नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. आकाशात झेपावणारे पतंग हे अधिक उंचावर गेले पाहिजेत. हे सर्व आपल्याच लोकांचे पतंग आहेत. हे पतंग कापण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र येणाऱ्या निवडणुकीत आपल्या समोर जे विरोधक असतील, त्यांचा पतंग या मतदारसंघातील जनतेच्या बळावर नक्कीच कापला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

vishal Patil
“काँग्रेस पक्ष माझ्यावर कारवाई करू शकेल असं वाटत नाही, कारण…”, विशाल पाटलांना विश्वास
sangli vishal patil marathi news, sangli loksabha vishal patil marathi news
नूरा लढतीसाठी प्रयत्नात असणाऱ्यांचा माझ्या उमेदवारीने अपेक्षाभंग – विशाल पाटील
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”

हेही वाचा…नाशिक – कांदा निर्यातबंदी करणाऱ्यांविरोधात मतदान बंदी

येणाऱ्या निवडणुकीत ज्यांची इच्छा आहे. त्यांनी विरोधात लढावे. मतदारसंघातील जनता त्यांना घरचा रस्ता दाखवेल. जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मकर संक्रातीच्या निमित्ताने येवला येथील कार्यालयात मंत्री भुजबळ यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तिळगुळ वाटप करीत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी चित्रकार संतोष राऊळ यांनी मंत्री भुजबळ यांना त्यांचे चित्र रेखाटलेला पतंग भेट दिला. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई आदी उपस्थित होते.

हेही वाचा…“मला आयएएस व्हायचंय”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रश्नाला आदिवासी विद्यार्थिनीचे उत्तर

येवल्यात पतंगोत्सव

पतंगबाजी करणाऱ्यांचे गाव अशी ओळख असणाऱ्या येवल्यात पारंपरिक हलगीच्या वाद्यावर ताल धरत हा उत्सव साजरा होत आहे. पतंगोत्सव आणि रंगपंचमी हे येवल्याचे आकर्षण. येवल्यातील पतंगोत्सव तीन दिवस चालतो. बाहेरगावी असणारे या काळात येवल्यात दाखल होऊन पतंगोत्सवाचा मनमुराद आनंद घेतात. येवल्यातील पतंग कमी वाऱ्यात उडतात. कारण त्यात वजनाने हलक्या काड्या वापरल्या जातात. या काळात मोठ्या आकारातील वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगी उडविण्याचे कौशल्य अनेकांकडून दाखवले गेले. यात पुरुषांच्या बरोबरीने महिला, युवतींचा सहभाग लक्षणीय असतो. घर व इमारतींच्या गच्चीवर फाफडा, जिलेबी, वडापाव, मिठाई अशा वेगवेगळ्या खाद्य पदार्थांवर ताव मारला गेला.