मालेगाव : अजमेर येथून एका खासगी प्रवासी बसमधून मालेगावात आणण्यात येणारा प्राणघातक शस्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. 

अजमेर येथून नाशिककडे निघालेल्या एका खासगी बसमधून मालेगाव येथे प्राणघातक शस्त्र आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार अप्पर अधीक्षक अनिकेत भारती आणि सहायक अधीक्षक टेकबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राष्ट्रीय महामार्गावरील म्हाळदे शिवारात सापळा लावला.

हेही वाचा – नाशिक : शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी अजय बोरस्ते, सहसंपर्कप्रमुखपदी राजू लवटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयित व्यक्ती प्रवास करीत असलेली बस पथकाने अडवून तपासणी सुरू केली. तेव्हा एका बॅगेत आठ तलवारी,आठ गुप्ती, दहा चाकू आणि पाच कुकरी अशी शस्त्रे आढळून आल्याने ती पोलिसांनी जप्त केली. तसेच ही शस्त्रे आणणाऱ्या परवेज आलम जमालुद्दीन (१९, रा. रसूलपुरा) यास अटक केली. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परवेज याने ही शस्त्रे कशासाठी व कोणास विक्रीसाठी आणली होती याबाबत कसून चौकशी केली जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली.