28 September 2020

News Flash

कोपरखैरणेत पादचाऱ्यांची अडचण

गटाराच्या कामाचे साहित्य रस्त्यावर

गटाराच्या कामाचे साहित्य रस्त्यावर

कोपरखैरणे गावठाणात गटारे बांधण्याचे काम सुरू असून यामुळे चालणेही मुश्कील झाले आहे. ठेकेदाराच्या बेशिस्त कामामुळे रस्त्यावरच बांधकाम साहित्य पडून असते. नाल्यातील पाणी मोटार लावून रस्त्यावर सोडण्यात येत असल्याने दरुगधीही पसरली आहे.

विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम करीत असताना कंत्राटदार कोण? कामाची मुदत किती? या माहितीचा फलक लावला नाही. कोपरखैरणे सेक्टर १९ येथे काही दिवसांपासून गटार पुनर्बाधणीचे काम सुरू असून हे काम एकूण साडेसहाशे मीटरचे आहे. मात्र नागरीवस्तीत अशी कामे करीत असताना रहिवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे अपेक्षित आहे. मात्र या ठिकाणी त्यांचीच मोठी अडचण केली आहे. बांधकाम साहित्य थेट रस्त्यावर टाकले जातेच शिवाय गटारांमधील पाणीही थेट रस्त्यावर सोडले जाते. गटारचे काम करीत असताना त्यातील पाणी हे नजीकच्या सुस्थितीत असलेल्या गटारांमध्ये टाकले जाते. मात्र या ठिकाणी थेट रस्त्यावर सोडण्यात येत असल्याने दरुगधी पसरली आहे.

सेक्टर १९ सी मधून १९ एककडे येतानाचे गल्लीतील दोन मार्ग आहेत. पैकी एक मार्ग गटाराच्या कामाने बंद झाला आहे. जो मार्ग बंद झाला त्याच्या सुरुवातीलाच ‘पुढे रस्ता बंद आहे, पर्यायी मार्ग वापरा’ असा फलक लावणे अनिवार्य असताना तो लावला नाही. वाहने थेट गटारापर्यंत येतात व मार्ग बंद दिसल्याने पुन्हा फिरत आहेत. यामुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे.

फलक रंगवायला

या शिवाय बांधकाम सुरू असताना त्या कामासंबंधित माहितीचा फलक लावणेसुद्धा अनिवार्य असताना लावण्यात आला नाही. या बाबत तेथील कर्मचाऱ्याला विचारले असता फलक रंगवायला दिला आहे, रंग सुकला की लावला जाईल असे उत्तर देण्यात आले.

माहितीचा वा रस्ता बंद असल्याचा फलक लावणे अनिवार्य आहे. शिवाय रहिवाशांना त्रास कमी होण्याची काळजी घेतली पाहिजे. याबाबत ठेकेदाराला सूचना त्वरित देण्यात येतील.    – शामराव शीरतोडे, अभियंता कोपरखैरणे विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 12:25 am

Web Title: bad condition of drainage system
Next Stories
1 भाजी बाजारावर मंदीचे मळभ
2 कोपरखैरानेतील नटराज बारवर गुन्हे शाखेची धाड
3 पापलेट, सुरमई २०० रुपयांनी महाग
Just Now!
X