04 March 2021

News Flash

बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

या कारवाईमध्ये तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहे.

घणसोली आणि तळवलीमधील तीन इमारतीवर बुधवारी कारवाई करण्यात आली.         (छाया : नरेंद्र वास्कर )

सिडकोने घणसोली आणि तळवलीमधील तीन इमारतीवर बुधवारी जेसीबी चालवून कारवाई केली. या कारवाईमध्ये तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहे.

घणसोली येथील स्मशनभूमीजवळ असणाऱ्या एक मजली इमारतीचे बांधाकाम व्यावसायिक संतोष राजपूत व कृष्णा पाटील करत होते.

तळवली सेक्टर २२ मध्ये महेंद्र पाटील यांच्या चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. तसेच एम. के. मढवी यांचे जोत्यापर्यंत आलेल्या इमारतीवर जेसीपी चालवून सिडकोच्या अतिक्रमण पथकाने इमारती जमीनदोस्त केल्या. या तीनही इमारतींवर या आगोदर कारवाई करण्यात आली होती. पण सिडकोची पाठ फिरताच पुन्हा बांधकाम व्यवसायिकांनी काम सुरू केले होते.

या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. बांधकाम व्यावसायिकावर एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सिडकोचे साहाय्यक अतिक्रमण नियंत्रक अधिकारी सुनील चिडचाळे यांनी दिली. तसेच ज्या भूखंडावर कारवाई करण्यात आली आहे. तिथे कुंपण टाकणार असल्याचेदेखील स्पष्ट केले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 2:54 am

Web Title: cidco talking action on illegal building
टॅग : Cidco,Illegal Building
Next Stories
1 सुस्त पालिकेच्या कानी रविवारी थाळीनाद
2 सेनेला पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
3 बेमुदत उपोषणास कारण बेसुमार अपघात..
Just Now!
X