दिघ्यातील ९४ बेकायदा बांधकामांवर कारवाईचे आदेश देतानाच बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायलयाने दिले. सोमवारी (ता.१९) होणाऱ्या सुनावणीच्या वेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना न्यायलयात हजर राहावे लागणार आहे. या दरम्यान रहिवाशांनीच बांधकाम व्यावसायिकांवर रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
या भागातील ९४ इमारतींपैकी शिवराम, पार्वती, केरू प्लाझा या तीन निवासी इमारती जमिनदोस्त करण्यात आल्या आहेत. नागरिकांना बनावट कागदपत्र दाखवून त्यांची लाखो रुपयांना फसवणूक केली.
शिवराम अपार्टमेंट मधील विजय पवार यांनी बांधकाम व्यावसायिक रमेश खारकर, मुकेश मढवी, निलेश मोकाशी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर केरू प्लाझा या इमारतीमधील विजय लाळे यांनी मनोज खारकर, विवेक पाटील, जगदीश पाटील, दशरथ खड़े, जीतेंद्र केणी या व्यासायिकांविरोधत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रबाले पोलीस अधिक तपास करीत आहेत.