नवी मुंबई पोलीस दल सोमवारी सकाळपासून ते दुपारपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खारघरमध्ये खासगी रुग्णालयाच्या उदघाटनासाठी येणार असल्याने पोलीस दल त्यांच्या सूरक्षेसाठी गुंतले होते. याचदरम्यान चोरट्यांनी कळंबोली वसाहतीमध्ये एका घरातील दरवाज्याचे कुलुप तोडून घरफोडी करुन २० तोळे सोने चोरले. य़ा चोरीमुळे कळंबोलीतील रहिवाशांच्या सूरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा- एपीएमसी बाहेरील बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासनाचा कारवाईचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसाहतीमधील सेक्टर ४ येथील एफ टाईप या सोसायटीत दूस-या मजल्यावर चोरट्यांनी चोरी केली. या चोरीत घरातील कपाटातील सूमारे सहा लाख रुपयांचे सर्व सोन्याचे दागीने चोरले. घरात कोणी व्यक्ती नसल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत दरम्यान ही चोरी केली. पोलिसांची विविध पथके या घटनेनंतर घटनास्थळी पोहचली. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सोमवारी सकाळपासून उपमुख्यमंत्री खारघरमध्ये येणार असल्याने तेथे कडक बंदोबस्त लावला होता. त्यामुळे शहराअंतर्गत गस्तीकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष झाले. चोरट्यांनी या दरम्यानच चोरीसाठीची अचुक वेळ निवडली.