पनवेल : मागील आठवड्यात खांदेश्वर आणि नवीन पनवेल वसाहतीनंतर सोनसाखळी चोरट्यांनी पनवेल शहरातील पायी चालणा-यांना लक्ष्य करण्यास सूरुवात केली. पनवेल शहरात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता पायी चालणा-या ७१ वर्षीय वृद्ध महिलेला सोनसाखळी चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली.

संबंधित वृद्ध महिला या नवीन पनवेल वसाहतीमधील सरकारी वसाहतीमध्ये राहतात. त्या त्यांचे भावासोबत पनवेल शहरातील पंचरत्न चौकातून पेडणेकर ज्वेलर्स सराफाच्या दुकानासमोरुन भाजीपाला घेऊन पायी चालत असताना दुचाकीवरुन आलेल्या दुकलीने पिडीत वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून तिथून पसार झाले.

हेही वाचा…“मुलींना मोफत शिक्षण, स्थानिक पातळीवर निवडणुका स्वतंत्र होतील”, अजित पवार यांचे सूतोवाच

या घटनेनंतर पनवेल शहर पोलीसांनी अनोळखी चोरट्यांविरोधात ७५ हजार रुपये किमतीचे दागीने जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.