नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २०२२ मध्ये महिन्याला ७७ वाहन चोरी होत असून केवळ सहा वाहनांची गुन्हे उकल होत आहे. २०२१ च्या तुलनेत एकूण वाहन चोरीत १०९ ने वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खंडणी विरोधी विभाग बंद करून वाहन चोरी उकल हा विभाग सुरु केला तरीही गुन्हे चोरी आणि उकल संख्या पाहता चोरी रोखण्यात आणि गुन्हे उकल करण्यात दोन्हीतही नवी मुंबई पोलीस सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबईत चौकांच्या कॉंक्रीटीकरनामुळे वाहतूक कोंडीचा फटका

नवी मुंबईत वाहन चोरीच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहन चोरी झाल्यावर वाहन मालकाचे नशीब असेल तरच वाहन मिळून येईल हे उघड सत्य आहे. जानेवारी ते नोहेंबर दरम्यान एकूण ९१३ वाहने चोरी झालेले असून त्या पैकी केवळ ८० गुन्हे उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे तर २०२१ मध्ये ८०४ वाहन चोरी झाले असून पैकी ७९ गुन्हे उकल करण्यात यश आले आहे. यात जड अवजड वाहन चोरी गुन्हे सर्वात कमी असून ३२ जड अवजड वाहने चोरी झाले आहेत तर केवळ ४ गुन्हे उकल झाली आहे. त्या तुलनेत २०२१ मध्ये  १९ वाहने चोरी झाले असून केवळ ७ गुन्हे उकल झालेली आहे. जड अवजड वाहने दर महिन्याला चोरी जात असले तरी मार्च, एप्रिल, जून,जुलै, आँगस्ट, सप्टेंबर आँक्टोम्बर आणि नोहेंबर महिन्यात एकही गुन्हे उकल झालेली नाही. २०२१ मध्ये जानेवारी ते मार्च मे ,आणि सप्टेंबर ,नोहेंबर मध्ये एकही गुन्हे उकल नाही.

वाहन चोरी गुन्हे पद्धतीचा अभ्यास करणे, अभिलेख तपासणे, घटनास्थळी भेट देणे, सीसीटीव्ही तपासणी, वाहन चोरीची पद्धत यापूर्वी कोण वापरत होते असा अभ्यास करून गुन्हे माग काढणे हे काम सदर पथकाकडे आहे. मात्र एखादा संशयित आरोपी वा गाडीचा ठावठिकाणा सापडला तरी तेथ पर्यंत जाण्यास गाडी दिली जात नव्हती कधी गाडी उपलब्ध असेल तर त्यात इंधन टाकण्यास निधी दिला जात नव्हता. 

हेही वाचा– नवी मुंबई शहरातील विकासकामे पर्यावरणाच्या मुळावर? पामबीच मार्गावरील सानपाडा भुयारी मार्गासाठी २२४ झाडांचा बळी

खंडणी विरोधी पथक विभाग बंद करून मोटार वाहन चोरी विरोधी पथकाची स्थापना फेब्रुवारी २०१८ मध्ये करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या कडे सोपवण्यात होती मात्र काही महिन्यात त्यांची बदली रबाळे पोलीस ठाण्यात करण्यात आली. सुमारे ९ ते १० महिने नेतृत्वहीन असलेल्या या पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक  पदी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड या अनुभवी आहेत. अमित काळे (उपायुक्त गुन्हे शाखा) या पूर्वी काही तांत्रीक अडचणी मुळे हे पथक पूर्ण क्षमतेने काम करू शकले नाही. मात्र सध्या या सर्व अडचणी दूर करण्यात आल्या असून एका सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गुन्हे उकल मध्ये नक्कीच समाधान कारक कामगिरी होईल. 

वाहन चोरी

जानेवारी ते नोहेंबर पर्यतची आकडेवारी
२०२२ / २०२१

वाहन / दाखल / उकल / दाखल/ उकल

जड वाहन/ ३२/४/१९/७
दुचाकी/  ६५६/३५/५६६/३५
कार/२२५/२२/२१९/३७
एकूण ९१३/८० ८०४/७९

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 77 vehicles stolen every month in navi mumbai dpj
First published on: 17-01-2023 at 10:19 IST