मोबाईलवर तुमचे सीमकार्ड बंद करण्यात येत आहे. अमुक अमुक क्रमांकावर संपर्क करा. असा संदेश आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा वा थेट सीमकार्ड कंपनीशी संपर्क करा, असे पोलिसांकडून वेळोवेळी सांगितले जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणे एका सुरक्षा रक्षकाला महागात पडले. सदर संदेशाला प्रतिसाद दिल्याने त्यांच्या खात्यातून ९९ हजार अज्ञात व्यक्तीने काढून घेतले आहे. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून सायबर शाखा पुढील तपास करीत आहे. 

हेही वाचा- कोपरखैरणेत नागरी आरोग्याचा बोजवारा; अडीच ते तीन लाख लोकसंख्येचा भार एकाच नागरी आरोग्य केंद्रावर

जानकीप्रसाद पांडे असे यातील फिर्यादीचे नाव असून ओएनजीसी मध्ये ते सुरक्षा रक्षकाचे काम करतात. ६ तारखेला त्यांच्या मोबाईलवर एक संदेश आला त्यानुसार त्यांचे सीम कार्ड २४ तासांच्यासाठी ब्लॉक करण्यात आले असून के.वाय.सी मागण्यात आली तसेच ८३८९८४७३९९ या क्रमांकावर संपर्क करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे पांडे सदर क्रमांकावर फोन केला असता समोरील व्यक्तीने UBIN  हे ऍप डाऊन लोड करण्यास सांगितले त्या ऍप द्वारा १० रुपये भरण्यास सांगण्यात आले त्यानुसार पांडे यांनी या सूचनांचे पालन करून १० रुपये पाठवले. काही वेळातच पांडे यांच्या बँकेतून ९ हजार ९९९ आणि ९० हजार पैसे अन्य खात्यात वळती झाल्याचा संदेश आला. पांडे यांनी तात्काळ पूर्वी लावलेल्याच ८३८९८४७३९९  या क्रमांकावर संपर्क केला मात्र मोबाईल बंद आला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी बँक खाते ब्लॉक केले व सायबर शाखेशी संपर्क करून गुन्हा नोंद केला. 

हेही वाचा- श्वानाचे चित्रीकरण करणे पडलं महागात; थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल, वाचा नेमके काय झाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरेश मेंगडे ( उपायुक्त गुन्हे शाखा) कुठल्याही अज्ञात व्यक्तीला आपले बँक डिटेल्स, पासवर्ड, अन्य कुठलीही माहिती देऊ नये, असे नेहमी सांगत सांगत असतो. आपले बँक खाते ऑनलाईन असेल तर त्यात जास्त रक्कम ठेवू नये. मात्र, त्याला फारसे कोणी महत्व देत नाही. असा कुठलाही संदेश आला तर त्या त्या संस्थेशी थेट संपर्क टाकून खात्री करा. ओ टी पी अज्ञात व्यक्तीला शेअर करू नये , बँक खाते/ सीमकार्ड / ए. टी .एम.  बंद झाल्याचा संदेश आला तर त्या त्या विभागाशी संपर्क करावा. आर्थिक फसवणूक होणारच नाही.